स्थैर्य, सातारा, दि. १७ : पुनवडी ता सातारा येथील 49/19 येथील खाणपट्ट्यात अवैध उत्खननं होत आहे . या प्रकरणाची आमची गेल्या दहा वर्षापासून तक्रार करत आहोत तरीपण जिल्हाधिकारी कोणतीच कारवाई करत नाही . येत्या सात दिवसात त्यांनी या प्रकरणात निर्णय न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा सुधीर देसाई व कमलाकर देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिला .
पुनवडी येथील बेकायदा उत्खननाच्या प्रकरणातून सुधीर देसाई यांच्यावर राजवाडा परिसरात मागील आठवड्यात दोघा अज्ञातांकडून तलवार हल्ला झाला होता . बेकायदा उत्खननाच्या संदर्भाने सुधीर देसाई आणि बंधू कमलाकर देसाई यांनी सोमवारी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन जिल्हा प्रशासनावर पुन्हा हल्लाबोल केला . कमलाकर देसाई म्हणाले पाटण कराड खंडाळा या तालुक्यात अटी शर्तींचे उल्लंघन झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे स्टोन क्रशर ताबडतोब सील केले जातात मात्र सातारा तालुक्यातील पुनवडीच्या क्रशरला कोणता वेगळा नियम लागू आहे . या उत्खनाने शासनाची कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडत असून याची आमच्या कडून गेली दहा वर्ष तक्रार करत आहोत . मात्र राजकीय दबावात काम करणारा महसूल विभाग अत्यंत भ्रष्ट विभाग आहे असा आरोप कमलाकर देसाई यांनी केला . पुनवडी येथील उत्खननाला ग्रामपंचायती चा कोणताही ना हरकत दाखला दिलेला नाही . या प्रकरणी खाण पट्टा चालविणाऱ्यांनी मोठे राजकीय हितसंबंध जोपासून राज्यशासनाची फसवणूक केली आहे . पुनवडी येथील खाण पट्ट्याला सायळी ग्रामपंचायती चा ना हरकत दाखला जोडून शासनाची दिशाभूल करण्यात आली . जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी येत्या सात दिवसात क्रशरवर कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला .
मनुष्यवध होण्याची वाट बघताय का ?
पुनवडी येथील बेकायदा उत्खननाचे प्रकरणातील मूळ तक्रारदार सुधीर देसाई यांच्यावर 23 फेब्रुवारी रोजी राजवाडा परिसरात तलवार हल्ला झाला होता . क्रशर चालविणाऱ्यांनी माझी सुपारी देऊन हा हल्ला घडविल्याचा आरोप देसाई यांनी करून या प्रकरणात शाहूपुरी पोलिस योग्य सहकार्य करत नसल्याची तक्रार केली . प्रत्यक्ष कोणाला अटक केली हे मात्र सांगितले जात नाही . संशयित आरोपीना तत्काळ अटक करावी त्यांच्या कडून पुरावे नष्ट केले जाऊ शकतात , तसेच संशयितां पासून आम्हाला व आमच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे . पोलीस प्रशासन काय मनुष्यवध होण्याची वाट बघतयं का ? असा संतप्त सवाल देसाई बंधूंनी केला .