दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । बारामती । विद्याप्रतिष्ठानचे कमलनयन बजाज आणि तंत्रज्ञान महाविद्यालय या महाविद्यालयाच्या विद्यार्थी व प्राध्यापक यांचा वसुंधरा अभियान अंतर्गत बारामती नगरपरिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या वेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे संस्थेचे विश्वस्त व नगरसेवक किरण गुजर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
नगरपरिषदेने महाविद्यालयातील स्थापत्य विभाग व उर्जा विभाग या दोन शाखांना जे काम दिले होते ते काम उत्कृष्ट पणे विद्यार्थी व प्राध्यापक यांनी केले पर्यावरण वाचविणे व वाढविणे व प्लास्टिक कचरा प्रबोधन आदी कार्यात महाविद्यालयाने कौतुकास्पद कामगिरी केल्याचे मान्यवरांनी सांगितले.
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. बिचकर, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. राहुल तोडमल, डॉ. मंगेश कोळपकर आणि प्रा. मंगल माळशिकारे या मान्यवरांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी आम्ही पर्यावरणाची योग्य ती स्वच्छता राखू व प्रत्येकजन आपल्या महत्त्वाच्या कार्यक्रमा दिवशी किमान पाच झाडे लावेल अशी हरित शपथ घेतली.
प्रा. दीपक सोनवणे, प्रा. प्रदीप पैठणे, प्रा. उमेश जगदाळे यांनी एन. एस. एस. च्या विद्यार्थ्यांना घेऊन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. दि. भ. हंचाटे यांनी सर्वमान्यवरांचे व उपस्थितांचे आभारप्रदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.