विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामतीत “नभांगन २०२३” हा स्नेहसंमेलनाचा उत्सव दिमाखात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ मे २०२३ । बारामती । दरवर्षी सालाबदाप्रमाणे सादर होणारे “नभांगन २०२३” हा स्नेहसंमेलनाचा उत्सव महाविद्यालयात अत्यंत उत्साहात आणि जल्लोसात साजरा झाला. ०४ मे २०२३ रोजी थीम डे तदनंतर ०५ मे २०२३  रोजी ट्रेजर हंट, कला दालन, आणि कॅरेक्टर डे, फिश पाँड ०६ मे २०२३ रोजी महाराष्ट्राची संस्कृती, कला, संस्कार याचे दर्शन घडविणारी सांस्कृतिक दिंडी व दुपारी साडी डे, फँशन शो. ०७ मे २०२३ रोजी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांसाठी स्वादिष्ट स्नेहभोजनाची अत्यंत उत्कृष्ष्ट व्यवस्था आणि ०८ मे २०२३ रोजी स्नेहसंमेलनाचा मुख्य आकर्षणाचा कार्यक्रम म्हणजेच “सांस्कृतिक रात्र” ही संस्थेच्या गदिमा सभागृहामध्ये अत्यंत उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणात साजरी झाली. याच कार्यक्रमाच्या दरम्यान महाविद्यालयात प्रत्येक विद्याशाखेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या तसेच क्रीडा विभागात विद्यापीठ स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या व इतर विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच महाविद्यालयाला NBA व NAAC A+ याचे नामांकन मिळवून देण्याकरता काम करणाऱ्या सर्व टीमचे महाविद्यालयाचे प्राचार्य व मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह पदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग, विद्यार्थी विकास कक्ष या विभागांमार्फत संपूर्ण वर्षभरात जे विविध सामाजिक, शैक्षणिक, समाज उपयोगी उपक्रम राबविले गेले त्याची ध्वनी चित्रफीत सर्वांसाठी दाखविण्यात आली. या कार्यक्रमात महाविद्यालयातील एकूण ४५ विद्यार्थ्यांच्या गटांनी अत्यंत हिरारीने व उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये लोकनृत्य, लावणी, नाटक, चित्रपट गीत, समूह नृत्य, तबला वादन, होम मिनिस्टर, कॉमेडी या सारख्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश कारण्यात आला होता.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, संस्कृतीक अधिकारी प्रा. पल्लवी बोके, विद्यार्थी विकास कक्ष अधिकारी प्रा. हनुमंत बोराटे, सांस्कृतिक सचिव कु. श्रेया जगताप तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख सर्व अधिष्ठाता, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले. हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत सुयोग्य नियोजनात व कोणतेही गालबोट न लावता पार पाडला त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी यांचे मनापासून आभार मानले. संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अँड. श्री. अशोक प्रभुणे, सचिव अँड. निलीमाताई गुजर, खजिनदार श्री. युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. श्री. राजीव शहा, श्री. मंदार सिकची, श्री. किरण गुजर, रजिस्टार कर्नल. श्री. श्रीश कंभोज या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रथमेश शिंदे, सांस्कृतिक सचिव श्रेया जगताप, रितेश साखरे, मुस्कान पठाण या विद्यार्थ्यांनी अत्यंत ओघवत्या व मोजक्या भाषेत केले. शेवटी  वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Back to top button
Don`t copy text!