दैनिक स्थैर्य | दि. २५ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटणमध्ये श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शैक्षणिक संकुलात ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाले. या प्रदर्शनात माध्यमिक शाळा गटात कमला निमकर प्रथम क्रमांक, प्राथमिक शाळा गटात मुदत हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जिल्हा परिषद सातारा, पंचायत समिती फलटण शिक्षण विभाग व फलटणमधील सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५२ वे फलटण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. पारितोषिक वितरण व सांगता कार्यक्रमासाठी श्री सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेच्या सचिव अॅड. सौ. मधुबाला भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. निखिल मोरे, शिवेंद्र पाटील, गटशिक्षण अधिकारी अनिल संकपाळ, विस्तार अधिकारी चन्नया मठपती, दारासिंग निकाळजे, केंद्रप्रमुख, गटसमन्वयक दमयंती कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
विज्ञान उपकरण प्राथमिक गट :
- प्रथम क्रमांक – मुधोजी हायस्कूल फलटण, फडे वीर सुदर्शन
- द्वितीय क्रमांक – श्रीमंत सगुनामाता विद्यालय दालवडी, सोहम रवींद्र बनकर, राजवर्धन हेमंत निंबाळकर
- तृतीय क्रमांक – प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल गुणवरे, रितिका सस्ते, आदित्य कदम
- उत्तेजनार्थ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळज, प्रणव विकास खराडे, संस्कृती पांडुरंग येळे, वैभवी महादेव जाधव.
- उत्तेजनार्थ – गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल नाईकबोमवाडी, जानवी गावडे, ऋतुराज बुधनवर, आदिराज टेंबरे
विज्ञान उपकरण – माध्यमिक गट :
प्रथम क्रमांक – कमला निमकर बालभवन फलटण, अधिबा जहागीर तांबोळी, श्रेया सुरेश यादव
द्वितीय क्रमांक – पाच पांडव माध्यमिक आश्रमशाळा अलगुडेवाडी, संतोष विनायक खोमणे, तुकाराम भाऊ गोरवे
तृतीय क्रमांक – हाजी अब्दुल रजाक उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, जोया मोहसीन कुरेशी, आदेशा समीर खान
उत्तेजनार्थ – सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, यश सचिन ननवरे, सुयश संतोष दीक्षित
उत्तेजनार्थ – छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय गिरवी, सर्वज्ञ सूर्यकांत धुमाळ
विज्ञान उपकरण दिव्यांग विद्यार्थी गट :
प्रथम क्रमांक – यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण, आयुष धनाजी पाटील,
शिक्षक विभाग माध्यमिक गट :
प्रथम क्रमांक – यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण, थोपटे संतोष आत्माराम
शिक्षक गट प्राथमिक विभाग :
सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण, सौ. निंबाळकर अमृता, सौ. आब्दागिरे प्रियांका, सौ. माळी शोभा, सौ. सोनवणे प्राजक्ता,
प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर गट :
प्रथम क्रमांक – सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, श्री. तात्याबा मारुती नाळे
प्रश्नमंजुषा स्पर्धा –
माध्यमिक विभाग प्रथम क्रमांक – प्रथम दोशी, स्नेहा सावळकर, आर्या बोंद्रे, साखरवाडी विद्यालय साखरवाडी.
द्वितीय क्रमांक – यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण, साहिल जाधव, आयुष पाटील, प्रणव अब्दागिरे,
तृतीय क्रमांक – प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल फलटण, श्रुती कापले, आर्यन बांदल, केशव महानवर
प्राथमिक विभाग :
प्रथम क्रमांक – बी. जे. इंग्लिश मीडियम स्कूल साखरवाडी, प्रनवी जगताप, वेदांत जाधव, सृष्टी सावंत
द्वितीय क्रमांक – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढमाळटेक, माऊली शिंदे, धनश्री घनवट, अनन्या औंदे
तृतीय क्रमांक – वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर, सानिया भंडलकर, वैष्णवी गोसावी, अनुज जमदाडे
वक्तृत्व स्पर्धा – माध्यमिक विभाग :
प्रथम क्रमांक – आयेशा सय्यद, सरदार वल्लभभाई हायस्कूल साखरवाडी
द्वितीय क्रमांक – हेमंत संदीप कोळेकर, सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण
तृतीय क्रमांक – स्वरा खरात, कमला निमकर बालभवन फलटण
उत्तेजनार्थ – अंजली गायकवाड, सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल तरडगाव
प्राथमिक विभाग –
प्रथम क्रमांक – आदित्य कदम, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल गुणवरे
द्वितीय क्रमांक – श्रावणी वाघमोडे, उत्तरेश्वर हायस्कूल विडणी
तृतीय क्रमांक – अनुष्का ठोंबरे, साखरवाडी विद्यालय साखरवाडी
उत्तेजनार्थ – आर्या सावंत, न्यू इंग्लिश स्कूल सुरवडी
यशस्वी विध्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
आनंदवन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण यांनी स्वागत केले. हणमंतराव पवार हायस्कूलचे प्राचार्य नागेश पाठक यांनी आभार मानले.
सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूलचा ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धा सन २०२४ मध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल याप्रसंगी स्मृतीचिन्ह देऊन या हायस्कूलला सन्मानित करण्यात आले.