
दैनिक स्थैर्य । दि. २६ मार्च २०२३ । बारामती । बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयास नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडेशन कौन्सिलने (नॅक) पुढील पाच वर्षांसाठी ‘ए प्लस’ दर्जा दिला आहे
प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, उप-प्राचार्य सुधीर लांडे, डॉ. निर्मल साहूजी, समन्वयक डॉ. संताजी शिंदे यांनी ही माहिती दिली. या समितीने मार्च महिन्यात दोन दिवस ‘राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदे’ने घालून दिलेल्या निकषानुसार शैक्षणिक प्रक्रियेत संस्थेची कामगिरी, अभ्यासक्रमाची निवड आणि अंमलबजावणी, शैक्षणिक दर्जा आणि मूल्यमापन, विद्यार्थ्यांचे निकाल, संशोधन कार्य आणि विद्या शाखा सदस्यांचे प्रकाशन, मूलभूत सुविधा आणि संसाधनांची स्थिती, आहे. प्रशासन, आर्थिक स्थिती, ग्रंथालय, प्रयोगशाळा, उपकरणे, संगणक या सारख्या विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या पायाभूत सेवा सुविधा, विविध क्षेत्रात महाविद्यालय कोणत्या पातळीवर आहे.
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारीवर्ग या सर्वाना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांचे काटेकोर गुणात्मक क्षमतेने मूल्यांकन व मूल्यमापन केले होते.
सर्व निकषांचे योग्यरीत्या परीक्षण करून ‘राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद’ यांच्याकडून २१ फेब्रुवारीपासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी A+ ग्रेड- 3.26 CGPA स्कोअरसह (सात पॉइंट स्केल) मान्यता दिली आहे.
संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, सचिव अॅड. निलीमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, मंदार सिकची, किरण गुजर, रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांनी प्राचार्य व सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.