दैनिक स्थैर्य | दि. २२ जून २०२४ | फलटण |
काळुबाईनगर (फलटण) येथील नवरात्र उत्सव समिती व काळुबाईनगर मधील महिलांनी वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुनीता सावंत, (डीआरपी) कृषी विभाग, फलटण, माजी नगरसेविका सौ. विजयाताई जाधव, अलका कुंभार, सुनिता सस्ते, वृषाली गायकवाड, छाया जगदाळे, वनिता सस्ते, अर्चना वाघमोडे, सुनीता लोखंडे, मनिषा बनकर, मनिषा अहिरेकर, सुमन घाडगे, रोहिणी खलाटे व महिला उपस्थित होत्या.
या कार्यास माजी नगरसेवक अशोकराव जाधव, रामदास सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.