दैनिक स्थैर्य । दि. २६ मे २०२२ । फलटण । समस्त भाडळी बु. गावच्या ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भवानी माता व शिवलिंग मंदिराचा कलशारोहण समारंभ शुक्रवार दि. २७/५/२०२२ रोजी विधिवत आणि मंगलमय वातावरणात होणार आहे. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम भाडळी बु. मधील श्री पोपटराव भोईटे आणि कुटुंबियांच्या वतीने स्वखर्चाने करण्यात आले आहे. मंदिर बांधकाम पुर्ण झाल्यानंतर मंदिराचा कलशारोहण समारंभ श्री. भोईटे कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी७ ते १० पर्यंत विधिवत होम-हवन होणार असुन सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत ह.भ.प.गुरुवर्य श्री सुरेश महाराज सुळ अकलूज (संस्थापक ज्ञानाई गुरुकुल अकलूज) यांच्या शुभहस्ते कलशारोहण समारंभ संपन्न होणार आहे. कलशारोहण समारंभानंतर दुपारी १२ नंतर भोईटे कुटुंबियांच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी रात्री ९ वाजले पासुन भजनी मंडळ भाडळी आणि पंचक्रोशी भजनी मंडळ यांच्यावतीने भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमासाठी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन भोईटे कुटुंबीय आणि भाडळी बु. ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आली आहे.