कळमेश्वर नगरपरिषद पाणीपुरवठ्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करा


पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांचे निर्देश

स्थैर्य, नागपूर, दि. 22 : कळमेश्वर नगरपरिषदेला पाणीपुरवठा करण्यासाठी चारगाव (चंद्रभागा ) प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यासाठी सुधारित प्रस्ताव देण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात  आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे, न. प. उपाध्यक्ष ज्योत्स्ना मंडपे, सिंचन विभागाचे  अभियंता  ढवळे, गवाणकर उपस्थित होते.

केदार म्हणाले, लोकसंख्येच्या तुलनेत आज रोजी नगरपरिषद क्षेत्रात 2.92 दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. यासाठी  चारगाव प्रकल्पाची भिंत वाढवून  पाणीसाठा वाढवता येईल का व अन्य कोणता पाणी स्त्रोत या प्रकल्पात वळवता येईल का याचा अभ्यास करून तातडीने प्रस्ताव नगरपरिषदेला द्यावा. शासनस्तरावर प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याची सूचनाही  त्यांनी  यावेळी  केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!