
दैनिक स्थैर्य | दि. १४ सप्टेंबर २०२३ | फलटण |
सद्गुरू हरिबाबा महाराज समाधी मंदिर मलठण (फलटण) येथे गेल्या ३४ वर्षांपासून श्रावण मासात संपूर्ण महिनाभर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुरू असून सद्गुरू हरिबुवा साधु महाराज देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने व सद्गुरू हरिबाबा महाराज सांप्रदायिक भजनी मंडळ यांच्यावतीने आयोजित केले जाते. यामध्ये महिला व पुरूष वाचकांचा दरवर्षी मोठ्या संख्येने सहभाग असतो.
बुधवार, दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता ज्ञानेश्वरी पारायण सांगता झाली. गुरुवार, दि. १४ रोजी सकाळी ८ वाजता अखंड हरिनाम, शुक्रवार, दि. १५ रोजी सकाळी ८ वाजता अखंड हरिनाम सांगता होणार आहे. सकाळी १० ते १२ श्री. हभप सुनील महाराज माने यांचे काल्याचे किर्तन व १२ वाजता आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री सद्गुरू हरिबुवा साधु महाराज ट्रस्ट व सद्गुरू हरिबुवा सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.