दैनिक स्थैर्य । दि. २२ डिसेंबर २०२१ । फलटण । मौर्य क्रांती संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष कालिदास मधुकर चोरमले यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. आगामी काळामध्ये वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्यामध्ये वाढवण्यासाठी आपण सर्व जणच कार्यरत राहू, असेही वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे वंचित बहुजन आघाडीचे संघटक तसेच पुणे शहराध्यक्ष अतुल बहुले, सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, जिल्हा संघटक इम्तियाज नदाब, महिला उपाध्यक्ष चित्रा गायकवाड, सुनील कदम, युवराज भोसले, सपना भोसले, जीवन पवार, मयुरी गायकवाड यांची उपस्थिती होती.
त्यासोबतच या कार्यक्रमासाठी फलटण तालुक्यातून युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने शामराव काकडे, सुखदेव रणदिवे, मंगेश माने, अविनाश रणदिवे, हनुमंत लोंढे, रोहित गायकवाड, अमित गायकवाड, महेश कांबळे, श्रीकांत रणदिवे, विकास मोरे, निलेश जगताप यांच्यासह राजुरी, मुंजवडी, तरडफ, विडणी, आसू, झिरपवाडी येथील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.