आसुत काळेश्वर गणेश उस्तव मंडळाने केली स्वखर्चातून औषध फवारणी


स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात व शेजारील तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनो या आजाराचा फैलाव न होण्यासाठी उपाययोजना म्हणून आसू ता. फलटण काळेश्वर गणेश उत्सव मित्र मंडळाने काळेश्वर नगर, शहीद जवान ज्ञानदेव काळे नगर, फाळके वस्ती, भवानी सोसायटी मागील परिसरात निर्जंतुकीकरणासाठी उपाय योजना म्हणून औषध फवारणी या वेळी करण्यात आली. यावेळी मोहन नामदास, जयराम  पाटेकर, गौतम पाटेकर, संतोष माने, रोहित पाटेकर, निहाल पवळे, ऋषिकेश भोसले, वसंत भोसले, केलास आडके, बाबू नामदास, मंगेश मंडले, विशाल पाटेकर, समीर फाळके, विशाल फाळके, गणेश फाळके, भालचंद्र काळे, अनिकेत काळे, बापू शिंदे यांनी परिश्रम घेतले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!