
दैनिक स्थैर्य । दि. १८ नोव्हेंबर २०२२ । फलटण । कालभैरव जयंतीनिमित्त ग्रामदैवत सिद्धनाथ मंदिर येथे सर्व तरुण मंडळ, ग्रामस्थ यांचे कडून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ,
कालभैरव देवाच्या जन्म काळामध्ये विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ सोनगाव यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला तसेच सिद्धनाथ देवाची आरती घेण्यात आली यावेळेस उपस्थित सर्वांनीच दीपोत्सव साजरा केला.
प्रत्येकाने आरती दरम्यान आपल्या कुटुंबाकडून एक मेणबत्ती रूपाने दिवा पेटवला. गावातील रोगराई दूर व्हावी, गावावरील संकट टळावेत, सर्व लोक सुखी समाधानी राहोत, गावात वाद विवाद संघर्ष होऊ नये, शिवारातील पीक पाणी चांगले यावे, शैक्षणिक विकास व्हावा, आरोग्य संपदा उत्तम राहावी, पशुधन चांगले रहावे, अश्या विविध मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून दिवा पेटवून देवाकडे मागणी केली.
सर्व महिला पुरुष ग्रामस्थ यांनी केलेल्या दीपोत्सवाने मंदिर परिसर तेजोमय झाला होता ..
यावेळेस गावातील दानशूर व्यक्ती कडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, सर्वांनी खूप श्रध्दा भावाने महाप्रसाद घेतला.
कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य ने-आण करणेसाठी शेंडे परिवारातर्फे मोफत वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती.
त्याच बरोबर महाप्रसाद करणेसाठी आचारी मदतीसाठी मंदिर परिसरातील कुटुंबांनी पूर्ण दिवस सहकार्य केले त्यामध्ये आडके परिवार, गायकवाड परिवार, चव्हाण परिवार, लोंढे परिवार यांचे सहकार्य लाभले. श्री शिवाजी ढवळे यांनी आपल्या ट्रॅक्टर च्या साह्याने मंदिर परिसर स्वच्छ केला, श्री निखिल कांबळे यांनी लाईट ,साउंड सिस्टीम ची जबाबदारी पार पडली.
या कार्यक्रमात सर्व पंचक्रोशीतील महिला , तरुण , ग्रामस्थ यांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे नियोजन सर्व तरुण मंडळ सोनगाव यांचेकडून खुप उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले .