दैनिक स्थैर्य | दि. 09 मार्च 2024 | फलटण | भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी राहिलेले मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांनी भारतीय जनता पार्टीला राम राम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत खराडे यांनी प्रवेश केला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले, माजी नगरसेवक किशोर नाईक निंबाळकर, युवा नेते भाऊसो कापसे, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने यांची प्रमुख उपस्थिती होती.