वैरत्व संपवून अनेक गावांत काका-बाबा गट एकत्र; कऱ्हाड दक्षिणेत दिसणार मनोमिलनाचा करिष्मा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कराड, दि.३: माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या मनोमिलनाचा कऱ्हाड दक्षिणमधील अनेक गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्रीकरणाचा करिष्मा दिसत आहे. काही गावांत गटांतर्गतच थेट दुरंगी लढती होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर किती गावात मनोमिलन रुचले आहे, तेही स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही गटांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, ऍड. उदयसिंह पाटील यांचे दोन कट्टर विरोधी गट 30 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. वैरत्व संपवून एकत्र आलेल्या या दोन्ही गटांनी यापुढच्या येणाऱ्या सर्व निवडणुका एकत्रीतपणे लढवण्याचा निर्धार केला आहे. त्याचा प्रारंभ मनोमिलनानंतर होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीतून होत आहे. तालुक्‍यातील 104 ग्रामपंचायतींसाठी अर्ज भरण्याची व अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी लढती होत असल्याचे दिसत आहे. सोमवारी (ता. 4) अर्ज माघारीच्या दिवशी त्याचे चित्र स्पष्ट होईल. मात्र, यावेळच्या निवडणुकीत कऱ्हाड दक्षिणमधील अनेक गावांत बाबा- काका गटाच्या मनोमिलनाचा करिष्मा दिसत आहे. मात्र, काही गावांत गटांतर्गतच थेट दुरंगी लढती होणार आहेत. गावागावांतील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर कऱ्हाड दक्षिणमधील किती गावांत बाबा-काका गटाचे मनोमिलन रुचले आहे, तेही स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही गटांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

दोन्ही गटांची लिटमस टेस्ट 
कऱ्हाड तालुक्‍यातील 104 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये कऱ्हाड दक्षिणमधील मोठ्या आणि महत्त्वाच्या ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. त्या ग्रामपंचायतींत दोन्ही गटांच्या एकत्रीकरणानंतर काय बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक ही दोन्ही गटांसाठीच्या कौलाची लिटमस टेस्टच ठरणार आहे.


Back to top button
Don`t copy text!