वाई फुलेनगर येथील कैलास जमदाडे यांना बगाड्याचा मान


स्थैर्य, 4 मार्च, सातारा : वाई फुलेनगर येथील श्री काळेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रेतील पारंपरिक व वैशिष्ट्यपूर्ण बगाडाची मिरवणूक गुरुवारी (ता. पाच) सकाळी नऊ वाजता वाकेश्वर येथून निघणार आहे. यावर्षी माजी नगरसेवक व आर्किटेक्ट कैलास जमदाडे यांना बगाड्याचा मान मिळाला आहे.

फुलेनगर येथे ग्रामदैवत श्री. काळेश्वरी देवीचे प्राचीन मंदिर आहे. ’अकलेची काळुबाई’ या नावाने ओळखली जाणारी ही देवी नवसाला पावते. देवीची वार्षिक यात्रा फाल्गुन पौर्णिमेपासून तीन दिवस भरते. यावेळी एक दिवस छबिना निघतो. दुसर्‍या दिवशी बगाड मिरवणूक निघते. देवीच्या नवसाची परतफेड करण्यासाठी बगाड घेण्याची प्रथा आहे. बगाड म्हणजे दगडी चाके असलेला रथ त्यावर बांबूच्या साह्याने तीस फूट उंचीचे शीड उभारलेले असते. हे शीड गोलाकार कैलास जमदाडे फिरते. त्यावर झोपाळ्याच्या गाडा असतो.मदतीने बगाड्यास टांगले जाते. त्यानंतर बगाड रथ चार-पाच बैलजोडीच्या साह्याने ओढला जातो. अधून-मधून बैल जोड्या बदलण्यात येतात. वाकेश्वर येथील नाथ म्हस्कोबा मंदिरापासून सकाळी नऊ वाजता बगाड मिरवणूक सुरू होणार आहे. तीन किलोमीटर अंतर कापून बगाड सायंकाळी पाचच्या सुमारास फुलेनगर येथील काळेश्वरी देवीच्या मंदिराजवळ पोहोचते. होळी पौर्णिमेच्या दिवशी बगाड्या ठरविण्यासाठी नाथम्हस्कोबाचे पुजारी चंद्रकांत होटकर (लोणंद) यांच्या मार्गदर्शनाखाली काळुबाई मंदिरात कौल घेण्यात आला.

यावर्षी कौल घेण्यासाठी 15 नवसकरी उपस्थित होते. पहिल्याच नवसकराच्या बाजूने देवाने कौल दिल्याने यावर्षी बगाड्याचा मान कैलास सदाशिव जमदाडे (वय 63 वर्षे) यांना मिळाला. ते गेली 30- 35 वर्षे यात्रा कमिटीच्या माध्यमातून सक्रिय असूनदेवीची सेवा करण्याची संधी मिळावी, यासाठी त्यांनी कौल लावला होता. पहिल्याच प्रयत्नात त्यांना संधी मिळाली. त्यांचे कुटुंब नारळीबागवाले जमदाडे म्हणून परिचित आहे. फुलेनगर येथील जमदाडे परिवारासह संपूर्ण फुलेनगरमध्ये आनंदी वातावरण पसरले आहे.


Back to top button
Don`t copy text!