स्थैर्य, खटाव, दि. १२ : खटाव तालुक्यातील पडळ येथील के. एम. शुगर कारखान्रातील अधिकार्याचा संशयास्पद मृत्यू झाला. गुरुवार दि. 11 रोजी सकाळी साडेनऊ वा. सुमारास ही घटना घडली. दरम्यान , मारहाण करणार्या संशयिताना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने हॉस्पिटल परिसरात तणाव निर्माण झाला होता. याबाबत नातेवाईकांचे जबाब घेतल्यानंतर पुढील कार्यवाही करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जगदीप धोंडीराम थोरात (वर 40, रा. गोवारे, ता. कराड) असे संशयास्पद मृत्यू झालेल्या अधिकार्याचे नाव आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले की, पडळ येथील के. एम. शुगर कारखान्रांमध्रे प्रोसेसिंग हेड म्हणून जगदीप थोरात कार्यरत होते. कारखान्यात अफरातफर झाल्याचे कारणावरून जबाबदार म्हणून थोरात यांना मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवार दि. 10 रोजी घडली. दरम्यान, जगदीप थोरात यांना गुरुवार दिनांक 12 रोजी पहाटे साडेतीन वाजण्याचा सुमारास त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना सकाळी 6 वाजता कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांनी मारहाण करणार्या संशयीतांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्राचे सांगितल्राने तणाव निर्माण झाला होता. तदनंतर मृतदेह वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालरात शवविच्छेदनासाठी पाठवण्रात आला. सारंकाळी उशिरा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन गोवारे येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन गेले. याबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली असून नातेवाईकांनी केलेला आरोपाबाबत जबाब घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.