स्थैर्य, फलटण, दि.१९ : सध्या फलटण तालुक्यासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊनचे आदेश सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पारित केलेले आहेत. त्या मुळे तृतीयपंथा मधील कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले निदर्शनास येताच के. बी. उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सचिन यादव यांनी फलटण तालुक्यातील तृतीयपंथी समजतील कुटुंबास किराणा मालाची किट्स उपलब्ध करून दिली व या पुढेही कधीही गरज लागेल तेंव्हा के. बी. उद्योग समूह मदत करेल अशी ग्वाही या वेळी सचिन यादव यांनी दिली.
तृतीयपंथी समजतील नागरिकांना नेहमीच फलटण शहरात व तालुक्यातील नागरिक व व्यापारी वर्गाकडून मदत होत असते. परंतु संपूर्ण लॉकडाऊन असल्याच्या कारणाने नागरिक व व्यापारी घराबाहेर पडताना दिसत नाहीत. जे नागरिक व व्यापारी घराबाहेर पडत असतात तेच अत्यावश्यक सेवेसाठी किंवा वैद्यकीय कारणासाठी बाहेर आलेले असतात. त्या मूळे अश्यावेळी नागरिकांना व व्यापाऱ्यांना त्रास देणे हे योग्य नसल्याने तृतीयपंथी समाजातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली होती. हे जाणूनच के. बी. उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सचिन यादव यांनी तातडीने तृतीयपंथी समजतील नागरिकांना मदतीचा हात पुढे केला.
के. बी. उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सचिन यादव यांच्या रुपामधून आम्हाला जणू काही या भूतलावरील देवच भेटला, अश्या भावना या वेळी तृतीयपंथी समाजातील नागरिकांनी व्यक्त केल्या.