के. बी. एक्सपोर्ट कंपनीच्या वतीने गरजूंसाठी स्टिम व्हेपोरायझर मशीनचे वितरण


 

स्थैर्य, फलटण दि.२ : फडतरवाडी ता. फलटण येथील आशा सेविका व गरजूंसाठी 100 स्टिम व्हेपोरायझर मशीनचे वितरण के. बी. एक्सपोर्ट कंपनीच्यावतीने करण्यात आले.

सामाजिक बांधीलकी जपण्याची के. बी. एक्सपोर्ट कंपनीची परंपरा असून फडतरवाडी गावातील कोरोना विरुद्धच्या लढ्यांमध्ये सहभागी होत कंपनीकडून या मशीनचे वितरण करण्यात आले, यापूर्वीही कंपनीच्या माध्यमातून लॉक डाउन कालावधीमध्ये जीवनावश्यक वस्तूं किटचे वाटप करण्यात आले असल्याचे फडतरवाडीचे पोलीस पाटील शांताराम काळेल पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

फडतरवाडी ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी बहुमूल्य मदत केल्याबद्दल के. बी. एक्सपोर्ट कंपनीचे डायरेक्टर सचिन यादव व जनसंपर्क अधिकारी संदीप शिंदे यांचे आभार फडतरवाडी ग्रामस्थ धनंजय भोसले, मंगेश नाळे, योगेश फडतरे, विजय फडतरे यांनी मानले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!