दैनिक स्थैर्य । दि. ११ मे २०२२ । गोखळी । फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित ज्योतिर्लिंग हायस्कूल, पवारवाडी (आसू) मधील सन १९९१ ते १९९७ या कालावधीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला.
ज्योतिर्लिंग हायस्कूलमध्ये वरील कालावधीत इयत्ता ५ वी ते १० वी या वर्गामध्ये शिक्षण घेतलेले सुमारे ४५ विद्यार्थी/विद्यार्थिनी या स्नेह मेळाव्यात सहभागी झाले होते. यावेळी मुख्याध्यापक विलास शेडगे, निवृत्त शिक्षक महादेव मोहिते, नाना सावंत, दादासाहेब जगताप, सुधीर निकम, विठ्ठल हंकारे, पोपट कातळगे, दत्तात्रय घोरपडे, पोपट पवार, अरविंद आगवणे, विष्णु पोतेकर, मोहन झणझणे, मदन इंगवले, महारुद्र घोगरे उपस्थित होते.
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी यावेळी शाळेस मुलांसाठी स्मार्ट टी.व्ही. भेट दिला. तसेच यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. निवृत्त शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन शेखर लोणकर, धनंजय जाधव, संतोष खाडे, नितीन वरे, भरत पवार, भारत मोरे, संजय हरिहर, बिपीन जगताप, हेमंत आटोळे, अश्विनी कापसे, कविता क्षीरसागर यांनी केले होते.