दैनिक स्थैर्य । दि. २३ जुलै २०२२ । फलटण । जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सातारा च्या प्राचार्या श्रीमती ज्योती दत्तात्रय मेटे यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन. त्या उत्तम प्रयोगशील शिक्षिका, उत्तम प्रशासक म्हणून ओळखल्या जायच्या.
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (फलटण) सातारा येथे प्राचार्य पदावर रुजू होण्या अगोदर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (वेळापूर) सोलापूर येथे प्राचार्य म्हणून सेवा केली आहे.
त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, मालोजीराजे सहकारी बॅंकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद साताऱ्याच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, फलटण तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था साताराचे सर्व अधिव्याख्याता,विषय साधन व्यक्ती, कर्मचारी, फलटण तालुका समुह साधन केंद्राचे सर्व शिक्षक विषय तज्ञ व कर्मचारी यांनी दुःख व्यक्त केले असून श्रीमती ज्योती दत्तात्रय मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.