
स्थैर्य, फलटण, दि. 2 ऑक्टोबर : येथील व्यापारी दत्तात्रय विठ्ठल भांबुरे यांच्या पत्नी आणि व्यापारी योगेश भांबुरे व संत नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष करण भांबुरे यांच्या मातोश्री, ज्योती दत्तात्रय भांबुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या कोळकी येथील निवासस्थानावरून निघालेल्या अंत्ययात्रेनंतर येथील वैकुंठ स्मशानभूमीत रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
सावडणे विधी गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० वाजता आणि दशक्रिया विधी गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे.