स्थैर्य, मुंबई, दि. 4 : कोरोना महामाराची काळात जीवाची पर्वा न करता वृत्तांकन करणारे पत्रकार आपले कर्तव्य बजावत आहेत. ते तोंडाला केवळ मास्क लावून अगदी रेडझोन परिसरात जावून वृत्तांकन करत आहेत. हे काम करत असताना मुंबईमध्ये 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती एनयुजेएमच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांना मिळाली होती. त्यांनी पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाकडे विमा कवच मिळावे अशी मागणी केली होती. त्या मागणीला यश आले असून पत्रकारांना 50 लाख रुपयांचे विमा कवच देण्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली.
सरकारने संबंधित पत्रकारांना कोरोनावीर म्हणून घोषित केले असून त्यांना 50 लाखांचे विमा संरक्षण जाहीर केले आहे.एनयुजे महाराष्ट्र आणि इंडिया यांनी देखील पत्रकारांना आर्थिक व इतर सहकार्य करावे याबाबत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
दरम्यान पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच जाहीर केले आहे. या योजनेचा लाभ सर्व पत्रकारांना मिळाला पाहिजे याकरिता शासनाने एक समिती स्थापन करावी अशी मागणी एनयुजेएसच्या अध्यक्षा शीतल कर्देकर यांनी केली आहे. दरम्यान पत्रकारांना विमा संरक्षण कवच जाहीर केल्याने त्यांना आता काम करणे अधिक सुलभ होणार आहे.