
दैनिक स्थैर्य | दि. १० जानेवारी २०२५ | फलटण |
फलटणचे पत्रकार सुभाष भांबुरे यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त आज, शुक्रवार, दि. १० जानेवारी रोजी ते शिंपी गल्ली, फलटण येथे सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
पत्रकार सुभाष भांबुरे हे फलटण पत्रकारितेतील वैभव, सतत हसरे व्यक्तिमत्त्व, नेहमीच सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारे म्हणून ओळखले जातात. तब्बल बत्तीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
साप्ताहिक श्रीहरी सुभाषितचे संपादक, श्रीहरी टूर अँड ट्रॅव्हल्सचे चालक/मालक, महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष, दैनिक नवराष्ट्रचे फलटण तालुका प्रतिनिधी, फरांदवाडी कृषी क्रांती अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन, छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयाचे संचालक, फलटण तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, कॉम्रेड माजी आमदार कै. हरिभाऊ निंबाळकर ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी लिलया पेलली आहेत.
वाढदिवसानिमित्त सुभाष भांबुरे यांना फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांनी तसेच त्यांचे मित्र व परिवाराने शुभेच्छा दिल्या आहेत.