पत्रकार शशिकांत सोनवलकर दर्पण पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 07 जानेवारी 2023 | फलटण | महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे दिल्या जाणाऱ्या दर्पण पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. यामध्ये विशेष दर्पण पुरस्काराने दुधेबावी येथील पत्रकार शशिकांत सोनवलकर यांना सन्मानित करण्यात आले आहे.

सिंदुदृग जिल्ह्यातील पोंभुर्ले येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर सभागृहात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधूदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत पांडुरंग सोनवलकर यांना विशेष दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी विशाल खत्री, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर यांच्यासह विविध मान्यवरांची यावेकी प्रमुख उपस्थिती होती.

पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, ग्रंथ असे होते.


Back to top button
Don`t copy text!