दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
शैक्षणिक, सामाजिक, क्रीडात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल वाठार निंबाळकर (ता. फलटण) येथील ‘आई प्रतिष्ठान’तर्फे पत्रकार शक्ती उर्फ अशोक मनोज भोसले यांना यावर्षीचा ‘आई सन्मान पुरस्कार २०२३’ जाहीर झाला आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार शक्ती भोसले यांचे विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
पत्रकार शक्ती भोसले हे साप्ताहिक फलटण रिपोर्टरचे संपादक आहेत व दैनिक ग्रामोध्दारचे फलटण तालुका प्रतिनिधी आहेत. त्यासोबतच ते उत्कृष्ट क्रिकेटपटूसुद्धा आहेत.