मुधोजी महाविद्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 12 जानेवारी 2025 | फलटण | फलटण एज्युकेशन सोसायटी व मुधोजी महाविद्यालयाच्यावतीने महाविद्यालय सभागृहात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकारांच्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की, “पत्रकार हे सुद्धा एक साहित्याचा महत्वाचा हिस्सा आहेत. विविध विषयांची मांडणी करताना पत्रकारांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाचन करावे लागते. आताच्या काळामध्ये पत्रकारांची व्याप्ती वाढली आहे. डिजिटल मीडियामुळे क्षणामध्येच बातमी जगभर पोहचते. पत्रकारांनी समाजात जागृत राहून काम करणे गरजेचे आहे.”

कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेविका सौ. ममता सिंधुताई सपकाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य पंढरीनाथ कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, मुकुटराव कदम, दादासाहेब चोरमले, बापूराव जगताप, यशवंत खलाटे – पाटील, विकास शिंदे, युवराज पवार, प्रसन्न रूद्रभटे, पोपट मिंड, काकासाहेब खराडे, अभिजीत सरगर, शकील सय्यद, सागर चव्हाण यांच्यासह विविध पत्रकार उपस्थित होते.

पत्रकार दिन साजरा करण्यामागील उद्देश समाजातील पत्रकारांच्या योगदानाचा सन्मान करणे आणि त्यांच्या कार्याची जाणीव करून देणे हा होता. या कार्यक्रमाने पत्रकारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यांच्या कार्याचे महत्व अधोरेखित केले.

पत्रकार दिन साजरा करण्याचा हा कार्यक्रम फलटणच्या मुधोजी महाविद्यालयात यशस्वीरीत्या पार पडला. याने पत्रकारांच्या भूमिकेचा सन्मान करण्यात आणि त्यांच्या कार्याची जाणीव करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. असे कार्यक्रम समाजातील पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे योगदान ओळखून देण्यासाठी आवश्यक आहेत.


Back to top button
Don`t copy text!