
दैनिक स्थैर्य । 15 मार्च 2025। फलटण । माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात फलटण तालुक्यातील वडगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रसिक सुरेश जगताप यांनी त्यांच्या विविध ग्रामपंचायत सदस्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी उपस्थित सर्वच ग्रामपंचायत सदस्यांचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले असून आगामी काळामध्ये गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे मत सुद्धा येवले व्यक्त केले आहे.
यावेळी निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, माजी नगरसेवक अहोकराव जाधव, सुदाम मांढरे, जेष्ठ नेते विलासराव नलावडे, तालुकाध्यक्ष अमोल सस्ते यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
वडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रसिका जगताप यांच्यासमवेत ग्रामपंचायत सदस्या सौ. कल्पना संजय गायकवाड, लालाबाई सोपं खरात, माजी सरपंच विमल जितोबा जगताप, माजी सदस्य संजय बबन गायकवाड, निशा मनोज जगताप, शरद नरसिंह ढेंबरे,पंढरीनाथ नामदेव यादव, जितोबा कृष्ण जगताप, सदाशिव नामदेव यादव, राजेंद्र रामचंद्र जगताप, शहाजी सर्जेराव जगताप, दादासो ज्ञानदेव शिंदे, गणपत आबाजी जगताप, रोहित रमेश जगताप, मनोज महादेव जगताप, लक्ष्मण चंदर जगताप, दादासो सुदाम काकडे, योगेश संपत जगताप, अजित विलास जगताप, शुभम शहाजी जगताप यांच्यासह विविध ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.