दैनिक स्थैर्य । दि.०८ फेब्रुवारी २०२२ । सातारा । दहिवडी तहसील कार्यालय किंवा कोल्हापूर येथील शासकीय येथे शासकीय नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून सातारा, सांगली व पुणे जिल्ह्यातील १८ जणांची १५ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. मारूती जयवंत साळुंखे रा. नरोटेवाडी ता. इंदापूर व प्रवीण राजाराम येवले रा. वडी, ता.खटाव अशी त्यांची नावे आहेत. त्यांना पोलीस कस्टडीत ठेवण्यात आले आहे.
याबाबत रमेश पोपट ढावरे यांनी दोन दिवसापूर्वी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक, सहा. पोलीस अधिक्षक आँचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले, सपोनि शशिकांत भोसले, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ.निलेश निकम यांनी केली.