
मोठ्या शहरातील सर्व सुविधां बारामती मध्ये देऊन रुचकर,स्वादिष्ट भोजन देत असताना रोजगार निर्मिती करून हॉटेल राजवाडा पार्क ने स्वतःचे वेगळेपण सिद्ध केल्याचे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले.
भिगवण रोड वरील हॉटेल राजवाडा पार्क चे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी ते बोलत होते.(रविवार २३ एप्रिल)
या वेळी बारामती बँक चेअरमन सचिन सातव, राष्ट्रवादी अध्यक्ष जय पाटील, युवक अध्यक्ष अविनाश बांदल, वंजारवाडी सरपंच किरणताई जगताप, मच्छिंद्र चौधर,पांडुरंग चौधर, प्रा. अजिनाथ चौधर, शिवाजीराव भोसले, विनोद चौधर, नवनाथ चौधर ,छत्रपती उद्योग समूहाचे अध्यक्ष संजय सावंत, कॉटन किंग चे वरिष्ठ उपाध्यक्ष खंडू गायकवाड, अमर घाडगे, भुजगराव मालुसरे, महादेव सावंत, संतोष सावंत आदी मान्यवर उपस्तीत होते.
नोकरी न करता ,नोकऱ्या देणारे होऊन आनंद सावंत यांनी हॉटेल च्या माध्यमातून मोठ्या शहरातील सर्व सुविधा बारामती भेटाव्यात व ख्वाव्ये ना सुग्रास भोजन देत वेळ व पैसा वाचावा म्हणून सावंत कुटूंबियांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
एक एकराच्या जागेत भव्य हॉटेल त्यामध्ये १० गुंठ्यांत जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांसाठी मोफत बोटिंग, लहान मुलांना खेळणी, फिश स्पा, फिश विथ टेबल, स्पाईन लाकूड पासून बनविलेले हॉटेल व टेबल खुर्ची, चारा खाऊ घालण्यासाठी देशी गाय, शाकाहारी व मांसाहारी भोजण्याची स्वतंत्र व्यवस्था, एकाच वेळी २०० लोकांची आसन क्षमता व मद्यपान करण्यास बंदी असल्याचे छत्रपती उद्योग समुहाचे संस्थापक आनंद सावंत यांनी सांगितले. या वेळी जागा मालक मच्छिंद्र चौधर यांचा पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले आभार सौ सोनाली सावंत यांनी मानले.