ज्ञानसागरच्या विद्यार्थ्यांचे स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये यश


दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२२ । बारामती । बारामती तालुक्यातील ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कूल मधील इयत्ता 1ली मध्ये शिकणारा विद्यार्थी हर्ष श्रीरंग जमदाडे ह्याने Keep On Rolling स्केटिंग क्लब बारामती अंतर्गत घेण्यात आलेल्या पावसाळी हंगामी खुल्या जिल्हा स्पीड स्केटिंग स्प्रिंट चॅम्पियनशिप मध्ये कास्य पदक मिळवून ज्ञानसागरच्या यशामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला.

तसेच सदर स्पर्धेमध्ये उत्तुंग यश संपादन केल्यामुळे संस्थचे अध्यक्ष सागर आटोळे यांनी सुद्धा हर्षला कौतुकाची थाप दिली व शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सरांनी ट्रॉफी व गुच्छ देऊन दोघांचाही गौरव केला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे उपाध्यक्षा रेश्मा गावडे, सचिव मानसिंग आटोळे ,दिपक सांगळे, पल्लवी सांगळे, दिपक बिबे, सीईओ संपत जायपात्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे, निलिमा देवकाते,स्वप्नाली दिवेकर, राधा नाळे या सर्वांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!