ज्ञानसागरच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीमध्ये यश


दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२३ । बारामती । बारामती तालुक्यातील सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल मधील इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांना सन २०२२  -२०२३ मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळाले आहे.
यामध्ये इयत्ता ५वी तील श्रेयस सचिन जाधव व ओजस नरेंद्र गोफणे त्याचप्रमाणे इयत्ता ८ वी तील तनुजा जनार्दन आटोळे, संस्कृती सुनील कुटे, तनुजा किशोर घोरपडे, श्रावणी संतोष पवार, रवी कमलेशकुमार पटेल, श्रवण नरेंद्र गोफणे या विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळाले आहे. याबद्दल त्यांचे शिक्षक, पालक तसेच शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर मानसिंग आटोळे यांनी कौतुक केले.

Back to top button
Don`t copy text!