दैनिक स्थैर्य । दि. ११ जानेवारी २०२३ । बारामती । दि.04 ते 09 जानेवारी दरम्यान राजस्थान येथे आयोजित करण्यात आलेली 18 वी राष्ट्रीय स्काऊट गाईड जांबोरी 2023 चे उदघाटन देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संपन्न झाले.
या वेळी राजस्थान राज्याचे राज्यपाल कलराज मिश्रा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, शिक्षणमंत्री बुलाकीदास कल्ला,अध्यक्ष राजस्थान स्काऊट गाईड गोविंदसिंह डोटासरा, राजस्थान चे चीफ कमिशनर निरंजन आर्य आदी मान्यवर उपस्तीत होते.
या आंतरराष्ट्रीय जांबोरीमध्ये देशातील आसाम, उडीसा, महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल प्रदेश,गुजरात, कर्नाटक, केरळ, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आश्या अनेक राज्यातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राकडून बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा हे नृत्य आविष्काराचे सादरीकरण उत्कृष्ट रित्या करुन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.यामध्ये समर्थ सपकळ, समीर घुले, संस्कार झगडे, प्रेम देवकाते, वेदांत मेरगळ, आरुष सुरनवर, ओम मदने, यश गाडेकर, भीमशंकर भंडारी असे एकूण नऊ विद्यार्थी, स्काऊट मास्टर व संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे सहभागी होते.तसेच इतर देशातील स्काऊट, गाईड, रोव्हर, रेंजर हे उत्साहाने सहभागी झाले. यामध्ये सांस्कृतिक मूल्यांची आदानप्रदान, देवाण घेवाण याद्वारे विविध सांस्कृतिक उपक्रमाबरोबर पर्यावरण जागृती, स्वच्छता मोहीम, साहसी उपक्रम, बायोलॉजिकल पार्क, शोभायात्रा, शारीरिक प्रात्यक्षिके , फुड माॅल ,शेकोटी कार्यक्रम असे अनेक उपक्रम या 18 व्या राष्ट्रीय जांबोरी मध्ये आयोजित करण्यात आले होते.