ज्ञानसागर गुरुकुल संस्कारक्षम पिढी घडविणारी आदर्श संस्था – शर्मिला पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ एप्रिल २०२३ । बारामती । बारामती तालुक्यात स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा उमटवणारी शाळा म्हणजे ज्ञानासागर इंग्लिश मिडीयम स्कूल, सावळ असा नाव लौकिक असणाऱ्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनात शुक्रवार दि.7 एप्रिल रोजी कलाविष्कार वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन व ज्ञानसागर पुरस्कार वितरण शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिला वहिनीसाहेब पवार यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी सन 2023 चा ज्ञानसागर समाजभूषण पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला वहिनीसाहेब पवार, डॉ.मनोज खोमणे, डॉ. निकिता मेहता, मा. श्री संग्राम सोरटे(उद्योजक), मा. हर्षदा खारतोडे(आर.टी.ओ.इनस्पेक्टर),माश्री. बाळासाहेब जाधव, पत्रकार बांधव सत्कार सोहळ्यामध्ये जितेंद्र जाधव , ज्ञानेश्वर रायते, जयदीप भगत, प्रशांत ननवरे, अनिल सावळे पाटील, समीर बनकर, अमोल तोरणे यांना सन्मानीत करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये श्री गणेश वंदना ,देशभक्ती गीते ,लोककलेतील मराठी व हिंदी गीते ,लावणी, भारुड , रिमिक्स गितांनी व ऐतिहासिक तानाजी थिम यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. मुलांच्या उज्वल भविष्यासाठी पालक व विद्यार्थ्यांसाठी इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे सर यांनी प्रास्ताविक तर अध्यक्षीय भाषणामध्ये वहिनीसाहेबांनी ज्ञानसागर गुरुकुल सावळ हे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाबरोबरच विद्यार्थ्यांची संस्कारक्षम पिढी घडविणारी आदर्श संस्था आहे असे सांगितले. प्रा. सागर आटोळे सर यांनी संस्थेच्या कार्याचा यशाचा चढता आलेख प्रस्ताविकातुन मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक श्रीराम सावंत व सहशिक्षिका वर्षा होले यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे सर यांनी मांडले. यावेळी ज्ञानसागर गुरुकुल सावळचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर आटोळे, संस्थेचे सचिव श्री मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, विश्वस्त पल्लवी सांगळे, श्री दीपक बिबे, दिपक सांगळे, सीईओ श्री संपत जायपत्रे , विभाग प्रमुख गोरख वनवे , दत्तात्रय शिंदे, निलिमा देवकाते,राधा नाळे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!