दैनिक स्थैर्य । दि. ३० डिसेंबर २०२२ । बारामती । ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूल सावळ, बारामती या शाळेतील एकुण 18 जण 3 काॅन्टींजट लिडर समवेत कर्नाटकात आंतरराष्ट्रीय स्काऊट गाईड जांबोरीमध्ये “उत्कृष्ट मार्चपास्ट ” परेडचे ज्ञानसागरच्या विद्यार्थ्यांनी केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
आझादी का अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित इंटरनॅशनल सांस्कृतिक जांबोरी, अल्वा एज्युकेशन सोसायटी, मुडबिदरी, जिल्हा-दक्षिण कन्नड ,कर्नाटक येथे दि 21 ते 27 डिसेंबर 2022 या कालावधीत पार पडली. एकुण 17 देशातील जवळपास पन्नास हजार विद्यार्थी नी सहभाग घेतला स्काऊट, गाईड,रोव्हर, रेंजर उत्साहाने सहभागी झाले. सांस्कृतिक मूल्यांची आदानप्रदान, देवाण-घेवाण या द्वारे विविध सांस्कृतिक उपक्रम केले होते त्याचप्रमाणे पर्यावरण जनजागृती, समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम, साहसी उपक्रम , बायोलॉजिकल पार्क , कृषी प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन , स्काऊट कौशल्य आत्मसात करणारे उपक्रम संपन्न झाले. उत्कृष्ट संचालन करीत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली ज्ञानसागर गुरुकुल चे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर आटोळे , विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे व मेजर बाबुराव चव्हाण यांनी उपस्तीत राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.