सातारच्या जिल्हाधिकारी पदी जितेंद्र दुडी; रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ जून २०२३ । सातारा । जिल्हाधिकारी रचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या बदलीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यांच्या जागी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची पदभार हाती घेतल्यानंतर शासनाच्या अनेक अनेक योजना वेळेत पूर्ण केल्या. जिल्ह्यातील सर्वसामान्यांसाठी नेहमी वेळ देणारे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द लक्षात राहिल.

कास, महाबळेश्वर, पाचगणी, कास अतिक्रमण, मॅप्रोगार्डन बाबत घेतलेली कडक कारवाई, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची नाराजी ही त्यांच्या बदलीचे कारण असू शकते. जितेंद्र दुडी हे सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

राजस्थान येथील मूळचे असणारे जितेंद्र दुडी हे २०१६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी झारखंड, नंदूरबार, मंचर, घोडेगाव या ठिकाणी सेवा बजावली आहे.


Back to top button
Don`t copy text!