जिंती गावात छ. शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २५ एप्रिल २०२३ | फलटण |
संपूर्ण देशात जयंतीचा उत्साह असतानाच जिंती गावात दि.१४ एप्रिल रोजी बुद्ध विहार फुलांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने सजवून फटाक्यांच्या आतिषबाजीने महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

दि.१६ एप्रिल रोजी महापुरूषांच्या प्रतिमा असलेले चित्ररथ सजवून डी.जे.च्या तालावर नाचत आणि घोषणा देत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता, तर दि.१७ एप्रिल रोजी ‘वंदन भीमरायाला’ या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता, तर मुस्लिम बांधवांनी सरबत वाटपाचा कार्यक्रम केला.

यावेळी गावच्या सरपंच पल्लवीताई लोखंडे, उपसरपंच समीर जाधव, विविध कार्यकरी सोसायटीचे चेअरमन अनिल रणवरे, व्हा.चेअरमन हरीभाऊ रणवरे, श्रीराम सहकारी कारखान्याचे संचालक शरद रणवरे, माजी सरपंच चंद्रकांत रणवरे, माजी उपसरपंच सदस्य शरदसर रणवरे, महादेव रणवरे, विष्णू रणवरे, प्रकाश रणवरे, मनोज रणवरे, राजकुमार रणवरे, संदीप शिंदे, पी.एन. रणवरे उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी भीमशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष अमित (दादासो) रणवरे, विजयभाऊ जगताप, प्रतिकभैय्या रणवरे, संकेत रणवरे, तेजस रणवरे, जीवन रणवरे, श्वेतांक रणवरे, शुभम रणवरे, प्रियांशू रणवरे, सचिन कदम यांनी मेहनत घेतली.


Back to top button
Don`t copy text!