दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । बारामती । बारामती तालुका मराठा सेवा संघ व पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुबंई यांच्या सयुंक्त विद्यमानाने मराठा समाज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास, कमकुवत व भूमिहीन शैक्षणिक गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जिजाऊ शिष्यवृत्ती शनिवार दि.12 नोव्हेंबर रोजी जिजाऊ भवन येथे वाटप करण्यात आली.
या प्रसंगी बारामती तालुका मराठा सेवा संघाचे आध्यक्ष नामदेवराव तुपे, विश्व्स्त देवेंद्र शिर्के, दीपक बागल, ऍड विजय तावरे, मनोज पोतेकर व छाया कदम जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा हेमलता परकाळे आणि संगीता शिरोळे व व्यवस्थापक अमोल चांदगुडे, पालक, विद्यार्थी उपस्तित होते.
तालुक्यातील 32 विद्यार्थ्यांना 12 वी नंतर विविध शैक्षणिक शाखा मधील शिक्षण घेण्यासाठी चार लाख रुपयाची जिजाऊ शिष्यवृत्ती देण्यात येत असल्याचे अध्यक्ष नामदेवराव तुपे यांनी सांगितले. जिजाऊ शिष्यवृत्ती योजना चा लाभ घेऊन शिक्षण पूर्ण करून तालुक्यातील बजरंगवाडी च्या शेतकऱ्याची मुलगी ऋतुजा साबळे हिची केंद्रीय अन्वेषण विभाग मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. शिष्यवृत्ती योजने माध्यमातून शिक्षणाला मदत होते याची जाणीव कायमस्वरूपी राहील व शिक्षण पूर्ण झाल्यावर नौकरी, व्यवसाय च्या माध्यमातून इतरांना मदत करण्यासाठी स्फूर्ती मिळत असल्याचे शिष्यवृत्ती लाभ धारक विद्यार्थिनी सिमरन वाघ यांनी सांगितले. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार देवेंद्र शिर्के यांनी मानले