मातोश्री मंगल कार्यालयातून १ लाख ८२ हजार रुपयांचे दागिने लंपास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 18 डिसेंबर 2023 | फलटण | आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावरील बरड गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या मातोश्री मंगल कार्यालयामधून रुपये १ लाख ८२ हजार २०८ रुपयांचे सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू चोरीला गेली असल्याबाबतचा गुन्हा फिर्यादी कैलास संभाजी ठणके, रा. मुंजवडी यांच्या फिर्यादी नुसार फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी कि; १ लाख ३५ हजार रुपयांचा सोन्याचा पावणेतीन तोळ्यांचा राणीहार, ३७ हजार रुपयांचा सोन्याचा एक कानातील टॉप्स, २ हजार ६०० रुपयांचा चांदीचा गणपती, २ हजार ५४४ रुपयांचे चांदीचे ब्रेसलेट, २ हजार ८५२ रुपयांचे चांदीचे ब्रेसलेट, २ हजार २१२ रुपयांचे चांदीचे पंचपाळे असे एकूण १ लाख ८२ हजार २०८ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चांगण करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!