दैनिक स्थैर्य | दि. २१ डिसेंबर २०२४ | फलटण |
कोळकी (ता. फलटण) येथील सिध्दीविनायक मंगल कार्यालयात लग्नसोहळा सुरू असताना वरपक्षाच्या रुममधून चोरट्याने सुमारे २,५९,१६० रुपयांचे दागिने असलेली पर्स लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.०० ते १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गणपत महादेव इदाते (रा. साईप्रसाद अपार्टमेंट, पॅनकार्ड क्लब रोड, बानेर, पुणे) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चोरीस गेलेल्या पर्समध्ये
१) २,०१,२२९/- रुपयांचे एक २९ ग्रॅम २४० मिली ग्रॅम वजनाचे गंठण जु.वा.कि.अ.
२) ४८,९३१/- रुपयांचे एक ६ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र जु.वा.कि.अ.
३) ८,००० /- रुपयांचा एक रेडमी कंपनीचा ८ ए.डयुल ३२ जीबी मॉडेलचा मोबाईल फोन व त्यामधील व्हीआय कंपनीचे सीमकार्ड नंबर ८८०५३१५४२३ असा असलेला जु.वा.कि.अ.
४) १,०००/- रुपयांची एक राखाडी रंगाची पर्स जु.वा.कि.अ.
एकूण २,५९,१६०/- रुपये असा मुद्देमाल होता.
या चोरीचा अधिक तपास म.पो.ना. हेमा पवार करत आहेत.