शाहूपुरी परिसरात ३ लाखाचे दागिने चोरीस


दैनिक स्थैर्य । दि. १८ ऑगस्ट २०२२ । सातारा । येथील शाहूपुरी परिसरात असणाऱ्या एका उघड्या घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने ३ लाख ३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १४ ऑगस्ट रोजी १०.३० ते दि. १६ ऑगस्ट रोजी १०.३० दरम्यान सातारा येथील शाहूपुरी परिसरात असणाऱ्या शिवाजीनगर येथील स्वरांजली अपार्टमेंटमधील राहत्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून एक सोन्याचे मिनी गंठण, ठुशी, मंगळसूत्र, सोन्याची चैन, कानातील वेल असा ३ लाख ३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेण्याची तक्रार सारिका सचिन सावंत यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!