दैनिक स्थैर्य | दि. २१ डिसेंबर २०२४ | फलटण |
भिवरकरवाडी (धुळदेव) गावच्या हद्दीत असलेल्या तुळजाई मंगल कार्यालयाच्या पाठीमागून २ लाख रुपये किमतीचे एक पिवळ्या रंगाचे जे.सी.बी. (क्र. के. ए. ९ झेड ४३९५) वाहन दि. १९ डिसेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार भारत हिरासिंग राठोड, (ड्रायव्हर, मूळ रा. मंदेवाल, ता. जिवरगी, जिल्हा गुलबर्गा, राज्य कर्नाटक, सध्या रा. कोळकी, फलटण, ता.फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
या चोरीचा अधिक तपास म.पो.ना. पूनम तांबे करत आहेत.