
दैनिक स्थैर्य | दि. 30 डिसेंबर 2022 | फलटण | फलटण नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व अतिक्रमणांवर नगर परिषदेच्या माध्यमातून मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेचा शुभारंभ काल करण्यात आलेला होता. ही मोहीम आज सुद्धा सुरू ठेवत शहराची जुनी बाजारपेठ असलेल्या रविवार पेठ परिसरामधील सर्व अतिक्रमणे जेसीबीच्या माध्यमातून जमीन दोस्त करण्यात आली.
यावेळी शहरातील व्यापाऱ्यांसह इतरांनी सुद्धा अतिक्रमण हटाव मोहिम बघण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती. यावेळी नगरपरिषदेचे सर्व विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फलटण शहरामधील सर्वच शासकीय ठिकाणी असलेली अतिक्रमणे पाडण्यात येत आहे. तरी त्यांची अतिक्रमणे आहेत त्यांनी ती स्वतःहून काढून घेऊन नगर परिषदेत सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी केलेले आहे. आगामी काळामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार असून शहरामधील सर्वच भागातील असणारी अतिक्रमणे काढून घ्यावेत, असेही मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलेले आहे.