जयसिंग अंतोबा गावडे यांचे निधन


स्थैर्य, आसू दि. २५ : गुणवरे, ता. फलटण येथील प्रगतशील शेतकरी जयसिंग अंतोबा गावडे तथा भाऊ यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.

त्यांचे पश्चात पांच मुले, सुना, एक भाऊ, भावजय आणि नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.

शेगर धनगर समाज महासंघाचे राज्य सचिव प्रा. शिवलाल गावडे यांचे ते वडील होत.

करोना संसर्गजन्य विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व दक्षता घेऊन गुणवरे येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोजके लोक उपस्थित होते.

करोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी लावण्यात आलेला लॉक डाऊन व अन्य नियमांमुळे अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित राहता येत नसल्याने त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर, गुणवरे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, आप्तेष्ट,  मित्र मंडळींनी समक्ष भेटून गावडे कुटुंबियांचे सांत्वन केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!