
फलटण तालुक्यातील विडणी येथे आज (मंगळवारी) ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भव्य जाहीर सभा. महायुतीचे उमेदवार सुषमा मोरे, सचिन अभंग आणि सारिका सोडमिसे यांच्या प्रचारासाठी दिग्गज एकवटणार. सायंकाळी ६ वाजता उत्तरेश्वर चौकात आयोजन. वाचा सविस्तर…
स्थैर्य, फलटण, दि. ०३ फेब्रुवारी : सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२६ च्या रणधुमाळीत आज फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. महायुतीचे (भाजप-राष्ट्रवादी) अधिकृत उमेदवार सौ. सुषमा मोरे (जि.प. गट), श्री. सचिन अभंग (पं.स. गण) आणि सौ. सारिका सोडमिसे (पं.स. गण) यांच्या प्रचारार्थ राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांची भव्य जाहीर सभा आज विडणी येथे आयोजित करण्यात आली आहे.
वेळ आणि ठिकाण: ही सभा आज, मंगळवार दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता, श्री उत्तरेश्वर चौक, विडणी (ता. फलटण) येथे संपन्न होणार आहे.
या सभेसाठी केवळ जयकुमार गोरेच नव्हे, तर फलटणमधील महायुतीचे प्रमुख शिलेदार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar), फलटण-कोरेगाव विधानसभेचे आमदार सचिन पाटील (MLA Sachin Patil) आणि फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष समशेरदादा नाईक निंबाळकर (Shamsher Naik Nimbalkar) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून विडणी, सांगवी आणि परिसरातील गावांमधून नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

