
स्थैर्य, सातारा, दि. २९ : जिल्ह्यात वाढता कारोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून एक सवयभान सातारकर म्हणून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय पुण्यशिल सुमित्राराजे नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन जयेंद्र चव्हाण यांनी घेतला आहे.
जयेंद्र चव्हाण यांचा वाढदिवस दरवर्षी दि. २९ रोजी विविध सामाजिक उपक्रपांनी साजग केला जातो. वाढदिनी आश्रमशाळा, जिल्हा रूग्णालयातील रूग्णांनी अन्नदान, शालय विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. यावर्षी संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातला आहे. सध्या अनेक रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ही गरज लक्षात घेवून जयेंद्र चव्हाण यांनी ऑक्सिजनच्या दोन मशिम कोविड सेंटरसाठी दिल्या आहेत. या शिवाय नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून ऑर्सेनिक गोळ्यांचे वाटपही केले आहे. कोरोनाचा साताऱ्यात शिरकाव झाल्यानंतर प्रशासनाने मार्चमध्ये
संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. या काळात लोकांचा रोजगार गेल्यामुळे अनेक कुटूबांवर उपासमारीची वेळ आली होती नेहमी ही अडचण लक्षात घवून जयद्र चव्हाण यांनी त्यांच्या प्रभागातील गरजवंतांना जीवनावश्यक किटचे वाटप केले. तसेच प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर जयेंद्र चव्हाण यांनी १ लाख ११ हजाराचा धनादेश मदत म्हणून प्रशासनाकडे सुपुर्त केला.
जयेंद्र चव्हाण हे सवयभान सातारकर या नात्याने नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असतात. ज्येष्ठ नागरिक संघ असो वा ज्येष्ठांसाठी सहल आयाजित करायची असो ते कायमच पुढे असतात. यापूर्वीही त्यांनी प्रशासनाच्या हाकेला साद देत वस्तु रूपाने अथवा धनादेशाद्वार मदत देण्याचे काम केले आहे.