दैनिक स्थैर्य | दि. ०५ डिसेंबर २०२४ | फलटण | भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष तथा माण – खटाव विधानसभा मतदारसंघात चौकार मारलेले जयकुमार गोरे हे कॅबिनेट मंत्री होत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पदी विराजमान होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत.
जयकुमार गोरे हे कॅबिनेट मंत्री होत सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी विराजमान झाले असल्याबाबतचा फ्लेक्स कोळकी परिसरात लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ना. देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले असून आता इच्छुक उमेदवारांनी मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यामधून श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व जयकुमार गोरे यांचे नाव भारतीय जनता पार्टीच्या कोट्यामधून आघाडीवर आहे. नक्की भारतीय जनता पार्टी मधून कोणाची वर्णी लागणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष वेधलेले आहे.