दैनिक स्थैर्य । दि. १९ मे २०२२ । पुसेगाव । खटाव तालुक्यातील वेटणे गावचा सुपुत्र व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा [ सी .आय . एस . एफ ] जवान मंदार मानसिंग नलवडे [वय ३२] याला आज [बुधवार] सकाळी पहावे पाचच्या सुमारास देशसेवा बजावीत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही बातमी समजल्यावर संपूर्ण वेटणे गावावर शोककळा पसरली आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा जवान ‘ मंदार याचे पार्थिव त्याच्या गावी आणले जाणार आहे.
जवान मंदार याचा जन्म १९८९ साली वेटणे या गावी झाला असून त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वेटणे येथे झाले तर इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण बुध येथील श्री. नागनाथ विद्या मंदिर येथे झाले. मंदार १२ वर्षापूर्वी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल जी. डी. या पदावर नोकरी करत असून मुंबई येथील नावासेवा बंदरावर ड्युटी करत होता. त्याचे २०१८ साली लग्न झाले असून तीन वर्षाचा त्याला मुलगा आहे. त्याच्या पाठीमागे आई-वडिल, पत्नी , १ मुलगा व लहान भाऊ असा परिवार आहे. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हदयविकाराचा तीव्र झटका आलय ने देशसेवा बजावीत असताना मृत्यू झाला. आज सायंकाळी उशिरा त्याचे पार्थिव वेटणे गावात येणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पार्थिवाची वाट संपूर्ण गाव पहात आहे.