
दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२१ । कोरेगाव । सोनके ता. कोरेगाव येथील जवान धर्मवीर रामचंद्र धुमाळ वय ४२ यांचे आज दु:खद निधन झाले.भारतीय भूसेना दलात कार्यरत असलेले परंतु गेले काही महिने आजारपणामुळे वैद्यकिय रजेवर असलेल्या धर्मवीर धुमाळ त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोनके गावावर शोककळा पसरली.
सोनके ता कोरेगाव येथिल जवान धर्मवीर धुमाळ भारतीय सेना दलात कार्यरत होते. परंतु गेले काही महिन्यांपासून आरोग्याच्या तक्रारीमुळे ते वैद्यकिय रजेवर होते.पुणे येथिल कंमांडो हॉस्पिटल येथिल डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते.दरम्यान गेले काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खलावली होती दरम्यान आज पहाटे त्यांचे द:खद निधन झाले.
त्यांच्या पश्चात् माजी सैनिक वडील, आई,पत्नी, मुलगा,मुलगी, भाऊ व त्यांचे कुटुंबिय असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोनके गावावर शोककळा पसरली.सातारा येथिल शासकिय रुग्णालयातून त्यांचे पार्थिव सोनके गावात येताच त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश मन सुन्न करणारा होता. वीर जवान धर्मवीर अमर रहे,वंन्दे मातरम यांसारख्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमला होता.फुले हारांनी सजवलेल्या ट्रेलर मधून त्यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली.पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर त्यांच्यावर सोनके येथील स्मशानभूमीत अंतिम अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोरेगाव फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक चव्हाण,कोरेगावचे तहसिलदार अमोल कदम,गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, वाठार स्टेशन पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संजय बोंबले जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ, माजी सदस्य सतिष धुमाळ, सरपंच संभाजी धुमाळ यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.