दैनिक स्थैर्य । दि. ३१ जुलै २०२२ । सातारा । श्रावण म्हटलं की व्रतवैकल्याचा महिना. तसेच श्रावण महिन्यात देवदर्शनासाठी ही भाविक गर्दी करत असतात. सातारा नजीक असलेल्या जरंडेश्वर डोंगर तर भल्या पहाटेपासून भाविकांनी गजबवून गेला होता. जरंडेश्वरावर मारुती रायचे तसेच प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे. श्रावणी शनिवारी जरंडेश्वर डोंगर भाविकांनी भरून वाहतो. मात्र, अपुरे वाहनतळ, अरुंद आणी खड्ड्याचा रस्ता असल्यामुळे वाहन धारकांना मोठी अडचण निर्माण होत होती. जरंडेश्वर डोंगरावर सातारा शहर, कोरेगाव व तसेच जवळील परिसरातून भाविक मोठ्या संख्येने गडावर येतात. डोंगर चढताना निम्या रस्त्यापर्यंत पायऱ्या आहेत तर निम्म्या मार्गावर डोंगरातील पायवाटेने मंदिरा पर्यंत जावे लागते. श्रीमारुती, प्रभुश्रीराम व महादेवाचे मंदिर गडावर आहे. येणाऱ्या भाविकांना खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात येतो.