जपानने आणीबाणी मागे घेतली : पंतप्रधानांची घोषणा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 25 : करोनाच्या संसर्गामुळे जपानमध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी अखेर मागे घेण्यात आली आहे. पंतप्रधान शिंजो आबे यांनी याबाबत घोषणा केली. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जपानमध्ये मागील महिन्यात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. आणीबाणी हटवल्यामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती पुन्हा वेग पकडणार आहे.

दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. सर्वच देशांना या समस्येवर कसं नियंत्रण मिळवायचं हा प्रश्न भेडसावत आहे. अनेक देशातील नागरिक लॉकडाऊनचं काटेकोर पालन करत नाहीत.परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. जपानमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच तिथले पंतप्रधान शिंजो अबे यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे.

जपानमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यास या देशाला यश मिळाले आहे. म्हणूनच इतके दिवस लॉकडाऊनमध्ये असणारा जपानमध्ये आता कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आले आहे.म्हणूनच पंतप्रधान शिंजो आबे यांनी सोमवारी राष्ट्रीय स्तरावर लागू केलेली आणीबाणी हटविण्याची घोषणा केली.

लाॅकडाऊनमधील सवलती अंतर्गत जिम, रिटेल दुकाने, रेस्तराँ, बार, सलून, थिएटर, उद्याेग, कार्यालये, धार्मिक स्थळ सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे. लॉकडाऊन हटवल्यानंतरही जपानमध्येही नियमांचे कडक पालन करण्यास सुरुवात केली आहे.

महत्त्वाचे म्हणजे सोमवारी पहाटेपर्यंत जपानमध्ये कोरोना विषाणूची लागण 16,550 च्या आसपास झाली होती. कोविड -११ च्या संक्रमणामुळे आतापर्यंत ८२० लोकांना जीव गमवावा लागला आहे.

जपानी नागरिक शिस्तीचं पालन करतात. जपानी नागरिक हे परावलंबी नसल्यानं स्वतःची कामं स्वतःचा करतात, त्यामुळे त्यांच्याकडे नोकर वगैरे जास्त  नसतात. तसेच जपानमध्ये स्वच्छतेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तिथे अस्वच्छता खपवून घेतली जात नाही. लहान मुलांना सुट्टीच्या दिवशीही उद्यानांमध्ये सफाई कशी करतात, याचं प्रशिक्षण दिलं जातं. देशातील सरकारच्या प्रत्येक नियमांचे पालन जपानी नागरिक करतात.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!